30 वर्षीय बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 30 वर्षीय बहिणीवर दोन भावांनी बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

30 वर्षीय बहिणीवर दोन भावांकडून बलात्कार

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चुलत भावांनी 32 वर्षीय भावाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले आणि त्याच्या 30 वर्षीय बहिणीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा उघडकीस आली असून, पीडित भावंडांनी पोलिसात धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

म्हैस खरेदी करायला गेले अन्...

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा भाऊ गावात राहणाऱ्या आरोपींकडून म्हैस खरेदी करण्यासाठी गेले होते. आरोपी या परिसरात एक डेअरी चालवतात. व्यवहार निश्चित करण्यासाठी ही भावंडे आरोपींच्या डेअरीवर पोहोचली असता, आरोपींनी त्यांना एका खोलीत कोंडले.

हे ही वाचा : नागपूरमध्ये महिलेनं नवऱ्याच्या हत्येसाठी 1 लाखांची दिली सुपारी, झटक्यात गेम केला ओव्हर

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार

पीडितेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे कि, आरोपींनी आधी तिच्या भावाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या अत्याचाराला जेव्हा भावंडांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

हे ही वाचा : उच्चभ्रू सासरा नातं विसरला, सुनेला दारु पाजून केला बलात्कार, पीडितेनं काय सांगितलं?

भयंकर प्रसंगानंतर गाठले पोलीस स्टेशन

या भयंकर प्रसंगानंतर पीडित भावंडांनी शुक्रवारी उशिरा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

हे वाचलं का?