नागपूरमध्ये महिलेनं नवऱ्याच्या हत्येसाठी 1 लाखांची दिली सुपारी, झटक्यात गेम केला ओव्हर

योगेश पांडे

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. महिला कौटुंबिक वादामुळे त्रासलेली होती. याच त्रासाला कंटाळून तिने पती गणेश बोरकरच्या हत्येचा कट रचला, एक अन्य आरोपी अभिजीत साखरेला अटक केली. अशातच दोन आरोपी सध्या फरार आहेत.

ADVERTISEMENT

Nagpur crime
Nagpur crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

point

नवऱ्याच्या मारहाणीची 1 लाख रुपयांची सुपारी

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. नागपूर पोलीस क्राईम ब्रांचने या प्रकरणात मनीषा बोरकर (वय 37) महिलेला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला कौटुंबिक वादामुळे त्रासलेली होती. याच त्रासाला कंटाळून तिने पती गणेश बोरकरच्या हत्येचा कट रचला, एक अन्य आरोपी अभिजीत साखरेला अटक केली. अशातच दोन आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी छापेरमारी केली आहे. 

हे ही वाचा : Astrology : बुधाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशीतील लोकांचे भाग्य बदलणार

आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश बोरकर (वय 45) वर 2 जुलै रोजी रात्री भांडेवाडी परिसरात धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश बोरकरच्या मृत्यूनंतर त्याच्या आईच्या तक्रारीवरून भांडेवाडी पोलिसांनी एफआरआय दाखल केला. 

नवऱ्याच्या मारहाणीची 1 लाख रुपयांची सुपारी

तपासादरम्यान पोलिसांचा मृत पत्नीवर संशय बळावला गेला, दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून मोठा वाद सुरू होता. पत्नीने नवऱ्याला अनेकदा धमकी देखील दिली होती. पोलिसांच्या तपासातून पत्नी मनीषा बोरकर यांनी कथितरित्या हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी दावा केला की, कौटुंबिक वादामुळे ती आपल्या दोन मुलांसह नवऱ्यापासून वेगळं राहत होती. याचदरम्यान महिलेनं मारेकऱ्यांशी संपर्क साधत नवऱ्याच्या मारहाणीची 1 लाख रुपयांची सुपारी दिली. 

हे ही वाचा : प्रियकरासाठी सोन्यासारख्या नवऱ्याला संपवले, डिलिट चॅट अन् 49 कॉल्समुळे प्रकरण उघडकीस

या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सर्व आरोपींना अटक केली जाईल आणि कटाचे संपूर्ण प्रकरण उघडकीस येईल. 

हे वाचलं का?