"डोक्यावर काठीने मारले...'', राहुल गांधी 'त्या' पोरांना घेऊन आले मीडियासमोर अन्..

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांवर आंदोलन करणाऱ्या NSUI विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

congress leader rahul gandhi nsui students police assault allegations delhi protest cec gyanesh kumar pm modi amit shah
राहुल गांधींचे सरकारवर गंभीर आरोप
Google CTA

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट मीडियासमोर आणत आज (14 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या विरोधात आंदोलन करत असताना ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी केरळमधील विद्यार्थिनी अथिराचा उल्लेख केला. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीमुळे अथिराने एका कानाची श्रवणशक्ती गमावली आहे. यावेळी असाही आरोप करण्यात आला की, काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर देखील काठीने मारहाण करण्यात आली.

राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थिनी एका कानाने ऐकू शकत नाही."

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केरळची रहिवासी असलेली अथिरा आता एका कानाने ऐकू शकत नाही. पोलिसांनी तिच्या कानावर मारल्यामुळे तिच्या ऐकण्यावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, यापूर्वी त्यांनी अशा एका विद्यार्थ्याला देखील मीडिया समोर आणलं होतं. ज्याला आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती.. आता एका विद्यार्थिनीने एका कानाची श्रवणशक्ती गमावल्याचे प्रकरण समोर आले आहे.

हे ही वाचा>> राहुल गांधींचं पहिल्यांदाच CJPच्या नेत्यांसाठी ट्वीट, नेमकं काय म्हणाले?

केरळची रहिवासी आणि दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या अथिराने आरोप केला आहे की, मंगळवारी एका आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलीस बसमध्ये मारहाण करण्यात आली. अथिराच्या म्हणण्यानुसार, तिला ताब्यात घेण्यात आले तेव्हा बसमध्ये एकही महिला पोलीस अधिकारी नव्हती.

तिने सांगितले की, तिने पोलीस अधिकाऱ्यांना विचारले की बसमध्ये महिला पोलीस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल कुठे आहे. अथिरा म्हणाली की, जर पोलीस एखाद्या महिलेला ताब्यात घेत असतील, तर तिथे किमान एक महिला कॉन्स्टेबल तरी असायलाच हवी.

कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनबाहेर मारहाणीचे आरोप

अथिराने आरोप केला की, तिची चौकशी केल्यानंतर पोलीस बस पुढे सरकली आणि कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनबाहेर थांबली. तिने दावा केला की, पोलिसांनी तिच्या गालावर वारंवार मारहाण केली. अथिराच्या म्हणण्यानुसार, या मारहाणीमुळे तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि कानाला इजा झाली.

हे ही वाचा>> सौरव दास आणि आशुतोष रांकाला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हे आंदोलन खरेतर मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. आता, राहुल गांधी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे उत्तर सादर झाल्यावरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

"आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्यापासून ते पोलीस हवालदारांपर्यंत सर्वांना शिक्षा देऊ."

राहुल गांधी म्हणाले की, मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज हा संपूर्ण राष्ट्राचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या आवाजाच्या विरोधात उभे आहेत. पोलिसांवर कारवाईचा इशारा देत राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांना मारहाणीचा पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवण्यास सांगितले आहे. खटला संपल्यानंतर या पुराव्याचा वापर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमार, अमित शाह यांच्यापासून ते विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या हवालदारांपर्यंत सर्वांना शिक्षा देण्याचे प्रयत्न केले जातील. राहुल गांधी म्हणाले की, हे आंदोलन हिंदू, मुस्लिम, किंवा कोणत्याही विशिष्ट जातीचे, किंवा स्त्री किंवा पुरुषाचे नाही, तर ते भारताचा आवाज आहे.