राहुल गांधींचं पहिल्यांदाच CJPच्या नेत्यांसाठी ट्वीट, नेमकं काय म्हणाले?
Rahul Gandhi Tweet on CJP Leaders Judicial Custody : CJP नेत्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर भाष्य केलंय. शांततापूर्ण आंदोलनात तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राहुल गांधींचं पहिल्यांदाच CJPच्या नेत्यांसाठी ट्वीट
नेमकं काय म्हणाले?
Rahul Gandhi Tweet on CJP Leaders Judicial Custody, नवी दिल्ली : CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तरुणांना आंदोलन केले म्हणून तुरुंगात डांबणे हे भ्याडपणाचे कृत्य असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत भाष्य केलं. अभिजीत दिपके यांनीही सौरव दास आणि रांका यांनी नेमका कोणता गुन्हा केला? असा प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा : पुणे : कोट्याधीशाच्या हत्येसाठी 20 लाखाची सुपारी, पण कॉन्ट्रॅक्ट किलरने चुकून कामगाराला संपवलं
सर्व आंदोलने 'त्याच' मागणीचा भाग आहेत - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनात तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात पाठवणे हे भ्याडपणाचे कृत्य आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि इंडिया आघाडी हे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून एकाच कारणासाठी लढत आहेत. नागरिक आपल्या घटनात्मक अधिकारांची मागणी करत आहेत आणि सर्व आंदोलने त्याच मागणीचा भाग आहेत. जंतरमंतर हे भारतातील जनतेचे आहे आणि ते पुन्हा जनतेच्या ताब्यात आणू, असेही राहुल गांधी नमूद केले.
हेही वाचा : पुणे : कोट्याधीशाच्या हत्येसाठी 20 लाखाची सुपारी, पण कॉन्ट्रॅक्ट किलरने चुकून कामगाराला संपवलं
CJP ने देशात आंदोलन सुरू केल्यापासून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच या सीजेपी नेत्यांच्या समर्थनार्थ भाष्य केले आहे. याआधी जंतरमंतरवरील CJP च्या आंदोलनात काँग्रेस नेते पवन खेरा यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. मात्र, राहुल गांधी यांनी स्वतः सोशल मीडियावरून या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष वेधले गेले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या वतीने जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या CJP नेत्यांना दिल्ली पोलिसांनी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. जामीन देताना घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तर अजिंक्य शिंदे यांच्याकडून बाँड लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
