सौरव दास आणि आशुतोष रांकाला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी
CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन देतेवेळी ठेवण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजिंक्य शिंदे यांच्याकडून बाँड लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सौरव दास आणि आशुतोष रांकाला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अजिंक्य शिंदे यांच्याकडून बाँड लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू
CJP leaders sourav das ashutosh ranka, दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP नेत्यांना दिल्ली पोलिसांनी काल (दि.13) सकाळी अटक केली होती. दरम्यान, न्यायालयाने सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. जामीन देतेवेळी ठेवण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर अजिंक्य शिंदे यांच्याकडून बाँड लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा : पुणे : कोट्याधीशाच्या हत्येसाठी 20 लाखाची सुपारी, पण कॉन्ट्रॅक्ट किलरने चुकून कामगाराला संपवलं
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन
दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी या आंदोलनस्थळी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह इतर काही आंदोलकांचा समावेश होता. या घटनेनंतर आता सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : नालासोपाऱ्यात इम्पिरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; 2 महिलांचा मृत्यू, 6 जण जखमी
जंतरमंतर परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मात्र, या बंदोबस्तानंतरही CJP च्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी प्रवेश केला. आंदोलकांनी प्रवेशद्वारावरील बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन देतेवेळी ठेवण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, अजिंक्य शिंदे यांच्याकडून बंधपत्र लिहून घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. CJP च्या कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
