पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल

मुंबई तक

Pune Monsoon : राज्यात पावसाने धुव्वादारपणे हजेरी लावली आहे, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत रस्त्याच्या खालून पाणी वाहत आहे, अशा स्थितीत रस्ता खचलेल्या अवस्थेत दिसून येतोय. प्रशासनाच्या या कामावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. 

ADVERTISEMENT

Pune Monsoon
Pune Monsoon
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तळेगाव दाभाडे परिसरात रस्त्याखालून पाणी वाहू लागलं

point

नगर परिषदेच्या प्रमुखानं कंत्राटदाराला धारेवर धरलं

Pune Monsoon : राज्यात पावसाने धुव्वादारपणे हजेरी लावली आहे, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत रस्त्याच्या खालून पाणी वाहत आहे, अशा स्थितीत रस्ता खचलेल्या अवस्थेत दिसून येतोय. प्रशासनाच्या या कामावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 

हे ही वाचा : नागपूरमध्ये महिलेनं नवऱ्याच्या हत्येसाठी 1 लाखांची दिली सुपारी, झटक्यात गेम केला ओव्हर

तळेगाव दाभाडे परिसरात रस्त्याखालून पाणी वाहू लागलं

हा व्हिडिओ पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरातील आहे. त्या व्हिडिओत निकृष्ट बांधलेल्या रस्त्याचा दर्जा दिसून येतो. त्याच बांधलेल्या रस्त्यातून अचानकपणे पाण्याचा लोट येताना दिसत असल्याचं व्हिडिओत दिसून येतंय.  

नगर परिषदेच्या प्रमुखानं कंत्राटदाराला धारेवर धरलं

घडलेल्या घटनेनुसार, सुमारे दीड वर्षांपासून रस्त्याखाली पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम करण्यापूर्वी कंत्राटदाराने पाईप जोडणं अपेक्षित होतं, मात्र ती पाईप जोडली गेली नाही. याचमुळे डांबरी रस्त्यातून पाण्याची गळती होऊ लागली.   

या प्रकरणी तळेगाव नगर परिषदेचे प्रमुख गिरीश दापकेकर यांनी काम करणाऱ्या कंत्राटदाराला धारेवर धरलं. या कामाला दापकेकर जबाबदार असल्याचं ते म्हणाले. पाईपलाईनच्या कामाची पुनर्बांधणी करण्यात यावी, यासाठी संपूर्ण खर्च संबंधित कंत्राटदारांकडूनच वसूल केला जाईल, असे ते म्हणाले.  

हे वाचलं का?