कर्ज काढून सख्ख्या बहिणीला दिले 55 लाख, तिनेच पाठीत खंजीर खुपसला, शेवटी घडलं भयानक

मुंबई तक

भावाने आपल्या बहिणीला कर्ज काढून 55 लाख रुपये दिले होते. मात्र बहिणीने ते पैसे परत केले नाहीत. यामुळे भावाने टोकाचे पाऊल उचलले. पंजाबमधील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कर्ज काढून सख्ख्या बहिणीला दिले 55 लाख

point

तिनेच पाठीत खंजीर खुपसला

point

शेवटी घडलं भयानक

Crime News : एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या बहिणीनेच भावाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यामुळे भावाने आपल्या कुटंबासह सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील चारही सदस्यांनी मिक्स ज्यूसमध्ये विषारी पदार्थ (सल्फास) मिसळून तो प्राशन केला. या धक्कादायक कृत्यामुळे 45 वर्षीय माजी बँक मॅनेजर आणि त्यांच्या 13 वर्षांच्या निष्पाप मुलीचा तडफडून मृत्यू झाला. कुटुंबातील इतर दोन सदस्य गंभीर  मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. ही अंगावर काटा आणणारी घटना पंजाबमधील पटियाला शहरात घडली आहे.

ज्यूसमध्ये सल्फास मिसळले अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (8 जुलै) रात्री उशिरा कुटुंबातील चारही सदस्यांनी घरामध्ये ज्यूसमध्ये सल्फास मिसळून प्यायले. विषाचा प्रादुर्भाव सुरू होताच त्यांची प्रकृती बिघडू लागली, ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने जवळच्या शासकीय राजिंदरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच 45 वर्षीय विकास बातीश यांचा मृत्यू झाला. तर त्यांची 13 वर्षांची मुलगी ख्वाहिश हिचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास यांची पत्नी तमन्ना आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा कनव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : घरात डोकावून पाहिल्याचा राग, क्षणात घेतला जीव; पाचगणीतील थरारक खुनाचा उलगडा

सामूहिक आत्महत्येमागची धक्कादायक कहाणी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रुग्णालय गाठून तपास सुरू केला. रुग्णालयाच्या खाटेवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तमन्ना यांनी मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवलेल्या जबानीतून या सामूहिक आत्महत्येमागची संपूर्ण धक्कादायक कहाणी समोर आली आहे. तमन्ना यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड आर्थिक चणचण आणि मानसिक तणावातून जात होते. त्यांचे पती विकास यांनी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला सुमारे 55 लाख रुपये उधार दिले होते. सर्वात मोठी अडचण ही होती की, या 55 लाख रुपयांपैकी तब्बल 45 लाख रुपये विकास यांनी स्वतः बँकेकडून कर्ज (लोन) घेऊन उभे केले होते.

हे ही वाचा : POCSO प्रकरणातील आरोपीकडून 6 जणांची हत्या, क्रूर मानसिकतेने कळस गाठला

बहिणीने पैसैच दिले नाहीत

दीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही विकास यांच्या बहिणीने ते पैसे परत केले नाहीत. पैसे न मिळाल्यामुळे बँकेचे कर्ज आणि त्यावरील व्याज वाढत गेले, ज्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी विकास यांच्यावर हप्ते भरण्यासाठी प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून विकास यांनी आपली बँक मॅनेजरची नोकरीही सोडली होती, ज्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन पूर्णपणे बंद झाले. तमन्ना यांनी आपल्या नणंदेसह, पतीच्या मोठ्या भावावर आणि बँकेच्या काही उच्च अधिकाऱ्यांवर मानसिक प्रताडनेचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून, पीडित महिलाच्या जबाबाच्या आधारे नातेवाईक आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांविरुद्ध तपास सुरू केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
 

हे वाचलं का?