महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक सुरू? पहिल्यांदाच शरद पवारांवर संजय राऊत नाराज!
Sanjay Raut and Sharad Pawar: एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवारांनी घेतलेल्या भेटीनंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक नाराजी व्यक्त केली. यामुळे आता महाविकास आघाडीतील समन्वय, आगामी राजकारण आणि संभाव्य परिणाम काय होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींना आता नवं वळण मिळाल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विधानभवनातील दालनात जाऊन घेतलेल्या भेटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिल्यांदाच शरद पवारांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीची स्थापना, विरोधी पक्षांच्या रणनीती आणि शरद पवार यांची भूमिका याबाबत कायम सकारात्मक भूमिका घेणारे संजय राऊत यावेळी मात्र स्पष्ट शब्दांत बोलले. त्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे का, अशी चर्चा रंगली आहे.
'गद्दारांच्या छताखाली बैठक घेणे योग्य नव्हते'
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या कृतीवर थेट नाराजी व्यक्त केली.
"ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठक घेणे मोठ्या नेत्याच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे. समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असताना गद्दारांच्या दालनात बैठक घेण्याची गरज नव्हती. आम्ही असतो तर अजित पवारांच्या दालनात आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. ज्यांनी आपल्या पक्षाशी बेईमानी केली, त्यांच्या छताखाली जाऊन पक्षाच्या बैठका घेण्याइतके आमचे मन मोठे नाही."
'शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत; पण...'
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर विश्वास व्यक्त करत ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले. मात्र, त्यांनी शरद पवारांच्या कृतीबद्दल नाराजी लपवली नाही.










