बुलढाणा : 8.5 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी 3 टक्के लाच; विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
buldhana crime news : साडेआठ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी 3 टक्के लाचेची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला एसीबीने 25 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बुलढाणा : 8.5 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी 3 टक्के लाच
विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
buldhana crime news, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी (एक्स्टेंशन ऑफिसर) म्हणून कार्यरत असलेल्या संदीप मोरे यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे ही कारवाई थेट जळगाव जामोद पंचायत समितीच्या कार्यालयातच करण्यात आली. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'तू अजून जिवंत आहेस...' सोन्यासारख्या बायकोला हॉस्पिटलच्या बेडवरच संपवलं
बिलाच्या रकमेच्या 3 टक्के इतक्या लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे साडेआठ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या 3 टक्के इतक्या लाचेची मागणी केली होती. या मागणीमुळे संबंधित व्यक्तीने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने या प्रकरणाची पडताळणी केली आणि तक्रारीतील बाबींची खातरजमा केली.
हेही वाचा : प्रियकराच्या भावाने अमृताला संपवलं, चारी-बाजूंनी घात झाला, निष्पाप विद्यार्थीनीचा जीव गेला










