अंबरनाथ लोकलमध्ये सीटचा वाद, लोखंडी कड्याने हल्ला; घटनेचा रक्तरंजित थरार
Kalyan railway assault : धावत्या अंबरनाथ रेल्वे लोकलमध्ये आज 16 जुलै 2026 रोजी पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंबरनाथकडे जाणाऱ्या लगेज डब्ब्यात तुफान मारहाण
जखमी रूग्णालयात दाखल
Kalyan Local Crime : धावत्या अंबरनाथ रेल्वे लोकलमध्ये आज 16 जुलै 2026 रोजी पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या प्रकरणी उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनं मध्यरात्री लोकमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली.
हे ही वाचा : Astrology : सूर्य-चंद्र ग्रहांची युती, काही राशींचं नशीब चमकणार
अंबरनाथकडे जाणाऱ्या लगेज डब्ब्यात तुफान मारहाण
घडलेल्या घटनेनुसार, अंबरनाथकडे जाणाऱ्या लगेजच्या डब्ब्यात सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या मारहाणीत जखमी झालेल्यांची राजू वाघे (वय 19), साहिल खंदारे (वय 19) आणि प्रितेश कनोजिया (वय 31) अशी ओळख समोर आली. या घटनेचा रक्तरंजित थराराचे फोटो समोर आलेले आहेत. संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका गटाने लोखंडी कड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला.
जखमी रूग्णालयात दाखल
जखमी झालेल्यांना तातडीने रुक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते. संबंधित घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांना रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली.
हे ही वाचा : नरेंद्र मोदींचा मूलांक किती? अंकशास्त्रज्ञांनी सांगितल्या खास गोष्टी
या हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या हिंसक प्रकारामुळे रेल्वे प्नवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.










