'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच...', आदिनाथ-उर्मिलाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मुंबई तक

Adianth kothare And Urmila Kothare Divorced : महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे, त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

Adianth kothare And Urmila Kothare Divorced
Adianth kothare And Urmila Kothare Divorced
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट

point

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Adianth kothare And Urmila Kothare Divorced : महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असून मुलगी जिजासाठी ते सदैव एकत्रच असतील, ती सर्वस्व आहे, तिला भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळावा, यासाठी तिची आनंदाने जबाबदारीने एकत्र येऊन तिचे सांगोपन करणार अशी पोस्ट करत अदिनाथ कोठारेनं माहिती दिली. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : वर्धा : 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या, आई-वडील घरी नसताना काय घडलं?

नेमकं काय आहे पोस्टमध्ये? 

"आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. 


आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.  गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.

हे ही वाचा : Astrology : सूर्य-चंद्र ग्रहांची युती, काही राशींचं नशीब चमकणार

म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद." 

हे वाचलं का?