'रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली, ढुं#&% सोडून चोऱ्या...', पेडणेकरांचा रुद्रावतार!
उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण केल्यावरून शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी 'रामरक्षा तुमच्या बापाने लिहिली का?' असा सवाल उपस्थित करत कदमांवर जहरी पलटवार केला.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा रामरक्षा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (UBT) आमनेसामने आले आहेत. शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केल्यानंतर शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
रामदास कदम काय म्हणाले?
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद असल्याचे म्हटलं.
त्यांच्या मते, काँग्रेस आणि गांधी कुटुंबासोबत राजकीय आघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा मांडणं हे जनतेला मान्य होणार नाही. त्यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीचाही उल्लेख करत, उद्धव ठाकरे यांचे सध्याचे हिंदुत्वावरील भाष्य हे केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
कदम यांनी पुढे दावा केला की, जनता सर्व काही पाहत असून आता ती अशा भूमिकांवर विश्वास ठेवणार नाही.










