टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली, बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या
Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये मंदिर दर्शनाच्या बहाण्याने 19 वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि दोन साथीदारांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली
बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या
Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका मंदिर दर्शनाच्या प्रवासादरम्यान घडलेल्या हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतील रहिवासी असलेला 23 वर्षीय रमेशची त्याच्या पत्नीकडून हत्या करण्यात आलीये. रमेशची पत्नी हसिनी आणि तिचा प्रियकर युगंधर यांनी मिळून हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..
हेही वाचा : मुंबईची खबर : 'बेस्ट'ची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, बीएमसीच्या महासभेत काय घडलं?
बालपणीचा मित्रासोबत प्रेमसंबंध, पतीचा काटा काढला
दोन वर्षांपूर्वी रमेश आणि 19 वर्षीय हसिनी यांचा विवाह झाला होता. त्यांना एक लहान मुलगीही आहे. मात्र, पोलिस तपासात हसिनीचे बालपणीचा मित्र असलेल्या 20 वर्षीय युगंधरसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून रमेशला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा! 48 वर्षीय महिलेवर पीएसआयने केला बलात्कार










