छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा! 48 वर्षीय महिलेवर पीएसआयने केला बलात्कार

मुंबई तक

छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने 48 वर्षीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा!

point

पीएसआयने केला 48 वर्षीय महिलेवर बलात्कार

Crime News, इसरार चिश्ती : छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने 48 वर्षीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धमकावून हॉटेल आणि घरात तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हरीश खटावकर असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. त्याच्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चार वर्षांपूर्वी ओळख

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पीएसआय हरीश खटावकर आणि तिची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. याचा गैरफायदा घेत खटावकरने मे 2015 मध्ये तिला एका हॉटेलमध्ये बोलावून पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये घराच्या इंटिरिअरचे काम पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबाच्या बदनामीची धमकी खटावकरने दिल्याची माहिती पीडितेने दिली.

हे ही वाचा : बीएमसीने ताज हॉटेलला बजावली 22 कोटींची नोटीस, नेमकं कारण काय?

​चालत्या कारमध्ये अमानुष मारहाण

यापुढे तर पीडितेसोबत भयानक घटना घडली. पीडितेचा तिच्या नवऱ्यासोबत वाद झाल्याने 15 जुलै 2026 रोजी तिला घर सोडावे लागले. याचा फायदा घेत खटावकरने तिला बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये कोंडले. सय्यद निसार नावाचा चालक गाडी चालवत असताना, खटावकरने चालत्या कारमध्येच पीडितेला अमानुष मारहाण केली आणि रात्री 10 च्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून तिला रस्त्यावर सोडून दिले.

हे ही वाचा : तुम्ही विचारही करू शकत नाही एवढं विचित्र राजकारण, NCP च्या विचित्र संघर्षाची भन्नाट Inside Story

​आरोपी पीएसआयचा वादग्रस्त पूर्वेतिहास

संशयित आरोपी हरीश खटावकर 1993 मध्ये पोलीस दलात भरती झाला. तो सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे. अकरा वर्षांपूर्वी एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याला निलंबितही करण्यात आले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?