सलाईन लावली अन् काही वेळाने नग्नावस्थेत आढळली, 15 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

मुंबई तक

एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये 15 वर्षीय मुलीवर झालेल्या कथित बलात्कारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी लॅब ऑपरेटरला अटक केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील हे प्रकरण आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सलाईन लावली अन् काही वेळाने नग्नावस्थेत आढळली

point

15 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?

Crime News : एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पॅथॉलॉजी लॅब चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून कसून केला जात आहे.

विवस्त्र अवस्थेत असल्याचे आढळले

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील आहे. येथील हसायन परिसरातील एका गावात राहणारी 15 वर्षीय पीडित मुलगी 13 जुलै रोजी उपचारासाठी एका स्थानिक क्लिनिकमध्ये गेली होती. तिथे औषधोपचार सुरू असताना तिला सलाईन लावण्यात आली. मात्र, सलाईन चढवत असतानाच ती बेशुद्ध पडली. काही वेळाने जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिला आपल्यासोबत गैरप्रकार झाल्याचे आणि ती विवस्त्र अवस्थेत असल्याचे आढळून आले.

हे ही वाचा : भयंकर! चिमुकली शाळेत जाण्यासाठी थांबली, 6 भटके कुत्रे आले अन्..VIDEO

कुटुंबियांना बसला धक्का

पीडित मुलीने आरोप केला आहे की, ती बेशुद्ध असताना या क्लिनिकशी संबंधित असलेल्या पॅथॉलॉजी लॅबचा संचालक प्रवीण याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर घरी पोहोचल्यावर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीयांनी तात्काळ हाथरस जंक्शन पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा! 48 वर्षीय महिलेवर पीएसआयने केला बलात्कार

लॅबमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग?

पीडितेची जिल्हा महिला रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस आता पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास पुढे नेत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर क्लिनिक आणि पॅथॉलॉजी लॅबमधील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. तसेच, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्यास त्यांचे फुटेजही तपासले जात आहे, जेणेकरून घटनेची सत्यता आणि परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकेल. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?