“रँचो आणि सोनम वांगचूक यांचा काहीही संबंध नाही, पण”, आमिर खान थेट बोलला

मुंबई तक

Aamir Khan on Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर अभिनेता आमिर खान यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच '3 इडियट्स'मधील रॅंचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

Aamir Khan on Sonam Wangchuk
Aamir Khan on Sonam Wangchuk
Google CTA

बातम्या हायलाइट

point

“रँचो आणि सोनम वांगचूक यांचा काहीही संबंध नाही, पण”

point

आमिर खान थेट बोलला

Aamir Khan on Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या उपोषणावर बसले आहेत. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या समर्थनार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एकही घास घेतलेला नसल्याचे सांगितले जात असून त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आंदोलनाची आणि आरोग्याची चर्चा देशभर सुरू असून अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : तुम्ही विचारही करू शकत नाही एवढं विचित्र राजकारण, NCP च्या विचित्र संघर्षाची भन्नाट Inside Story

 '3 इडियट्स'मधील 'रँचो' वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनापेक्षा त्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर '3 इडियट्स' चित्रपटात चतुरची भूमिका साकारणारे अभिनेता होमी वैद्य यांचा एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण 'रँचो' म्हणजेच सोनम वांगचुक यांना अशा अवस्थेत पाहू इच्छित नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा '3 इडियट्स'मधील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा रंगू लागली.

हेही वाचा : IAS मुंढे इफेक्ट! गुटखा कसा बनतो? चालू फॅक्टरीवर धाड, आरोपी पसार अन्..VIDEO

हे वाचलं का?