शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध; बेडवर विषारी साप सोडून खून
साप चावल्याने झालेला मृत्यू हा प्रत्यक्षात नियोजित हत्येचा कट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नी, तिचा प्रियकर आणि इतर दोघांनी मिळून ही हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध
बेडवर विषारी साप सोडून खून
UP Crime News : साप चावल्याने झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण पोलीस तपासात धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. सुरुवातीला हा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान हा अपघाती मृत्यू नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे पोलिसांनी उघड केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अतुल पंवार यांचा खून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केल्याचं समोर आलंय. अतुल यांची पत्नी दामिनी हिने तिचा कथित प्रियकर तुषार उर्फ निक्की आणि आणखी दोघांच्या मदतीने पतीला संपवण्यासाठी विषारी सापाचा वापर केला. या हत्येमागे 20 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम आणि प्रेमसंबंध हे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदी हुकूमशाह; आजवर एवढा वाईट पंतप्रधान झाला नाही, अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
अनैतिक संबंधातून नवऱ्याला संपवलं, 20 लाखांच्या इन्सुरन्सवर डोळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडोरा गावातील 35 वर्षीय अतुल पंवार आणि त्याची पत्नी दामिनी हे हस्तिनापूरमधील रामलीला मैदान परिसरात कृष्णा किड्स पब्लिक स्कूल चालवत होते. दोघांनी 2019 मध्ये प्रेमविवाह केला होता. शुक्रवारी सकाळी दामिनी हिने पतीला साप चावल्याची माहिती देत त्याला हस्तिनापूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी अतुलच्या बेडमध्ये सापही आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान दामिनीच्या मोबाईलची कॉल डिटेल आणि तांत्रिक पुराव्यांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये शाळेचा ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की याच्याशी तिचा सतत संपर्क असल्याचे समोर आले. चौकशीत तुषारने दामिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि दोघांनी मिळून अतुलच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : दूधात भेसळ ते अस्वच्छता, तुकाराम मुंढेंनी मुंबईत 5 हॉटेल्सचा बाजार उठवला..










