नरेंद्र मोदी हुकूमशाह; आजवर एवढा वाईट पंतप्रधान झाला नाही, अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई तक

narendra modi criticism by abhijeet dipke : सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलक अभिजीत दिपके यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. त्यांनी 20 जुलैच्या मोर्चासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

ADVERTISEMENT

narendra modi criticism by abhijeet dipke
narendra modi criticism by abhijeet dipke
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र मोदी हुकूमशाह; आजवर एवढा वाईट पंतप्रधान झाला नाही

point

अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल

narendra modi criticism by abhijeet dipke, दिल्ली  : शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 20 व्या दिवशी पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. जंतर-मंतर येथे आंदोलकांविरोधात दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत दिपके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच 20 जुलै रोजी होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणारच असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जर लोक आजही घराबाहेर पडून जंतर-मंतरवर आले नाहीत, तर सोनम वांगचूक यांनी 20 दिवस केलेल्या उपोषणाच्या त्यागाला अर्थ उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा : बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप.., छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा VIDEO

'नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान'

आपण परदेशातून देशात परतलो कारण आपल्याला देशाच्या संविधानावर विश्वास होता, असे दिपके यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपल्याला रोखण्याचा, बदनाम करण्याचा आणि विविध आरोप करण्याचा प्रयत्न होईल, याची कल्पना होती. मात्र संविधान आपल्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत त्यांना देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचे म्हटले. शिवाय मोदी हे हुकूमशाह असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुलांवर लाठीचार्ज होत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसत असल्याची टीकाही केली.

हेही वाचा : 'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हा विचारच मला सहन होत नव्हता..' तरुणीवर कॉलेजमध्येच सपासप वार

हे वाचलं का?