रामरक्षा येते का? CM फडणवीसांचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं खरमरीत उत्तर म्हणाले...

मुंबई तक

Uddhav Thackeray : "देवेंद्र फडणवीसजी रामरक्षा म्हणणं तुमचं काम असलं, तरीही रामरक्षा हे आमचं काम आहे. मनात नाही भाव अन् देवा मला पाव हे आमचं हिंदूत्व नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील रामरक्षा आंदोलनात 18 जुलै 2026 रोजी सरकारवर हल्ला बोल केला. 

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"कॉन्ट्रॅक्टरला अभय देणारं आमचं हिंदूराष्ट्र नाही"

point

"तुमचे हिंदुत्व हे ढोंगी"

point

 "देवेंद्र फडणवीसजी रामरक्षा म्हणणं तुमचं काम"

point

'रामरक्षा करणं आमचं काम'

Uddhav Thackeray Ram raskha Nagpur protest : "देवेंद्र फडणवीसजी रामरक्षा म्हणणं तुमचं काम असलं, तरीही रामरक्षा हे आमचं काम आहे. मनात नाही भाव अन् देवा मला पाव हे आमचं हिंदूत्व नाही. दिल्लीत सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत, त्यांची कशा पद्धतीने उचल बांगडी केली. जाणू एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं चादर वगैरे टाकून त्यांना नेण्यात आले. तिकडे अभिजीत दीपके बसला होता त्याला देखील मारहाण केली, शाई फेकली", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील रामरक्षा आंदोलनात 18 जुलै 2026 रोजी सरकारवर ताशेरे ओढले. 

हे ही वाचा : जळगाव: आदिवासी महिलेला गुंगीचं औषध दिलं, दोरीनं बांधून लैंगिक अत्याचार

"कॉन्ट्रॅक्टरला अभय देणारं आमचं हिंदूराष्ट्र नाही"

ते म्हणाले, "मी श्रीरामाला देखील विचारलं की, या भाजपने श्रीरामाच्या नावाने मत घेतली. आता त्याच भाजपच्या अंगात सैतान घुसला की काय? यांच्यातील माणुसकी गेली बाजूला. मला मोहन भागवत यांना प्रश्न विचारायचे आहेत, की या देशात भाजप सरकार कसं वागतंय बघा, मंदिरं लुटली जात आहेत, पेपर फुटी होतेय, पक्ष फोडले जातायत, तिजोरी फोडल्या जातायत. हेच तुमचं हिंदूराष्ट्र का? आम्हाला हे हिंदूराष्ट्र नव्हे, हिंदूराष्ट्रात आम्हाला रामराज्य अपेक्षित आहे. आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे. महिलांना, मुलांना, गोरगरीबांना न्याय देणारं हे हिंदुराष्ट्र हवंय. कॉन्ट्रॅक्टरला अभय देणारं आमचं हिंदूराष्ट्र नाही." 

पुढे ते म्हणाले की, "भागवतजी या फेब्रुवारीत तुम्ही म्हणाला की, या देशातील मुस्लिम हा देखील हिंदूच आहे. तर हिंदूंनी 2-3 अपत्य जन्माला घालणं गरजेचं आहे. अपत्य जन्माला घातल्यानंतर त्यांचं देखील असंच होणार असले तर काय फायदा. आता पेपरफुटी झाली त्याचं काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून पुढे त्यांना तुम्ही असंच चिरडणार आहात का? हेच हिंदूराष्ट्र आमच्या संकल्पनेतील नाहीये."  

"तुमचे हिंदुत्व हे ढोंगी"

"देवेंद्र फडणवीस रामरक्षा म्हणता येते म्हणून मंदिराची चोरी क्षमा असेल, तर ते अजिबात मान्य नाही. लाखो करोडोंच्या हिंदूंनी बांधलेले ते मंदिर आहे, अनेकांनी आपल्यावर केसेस घेतलेल्या आहेत. छातीवर वळ उटले तरीही कोणीही मागे हटले नाही. त्या शिवसैनिकांना घेऊन रामरक्षा म्हणण्याऐवजी मी रामरक्षा करण्याचा लढा करतोय. चोरांनो मध्ये येऊ नका, हा रामभक्त राम मंदिर चोर असा हा लढा आहे. देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत हे कोणत्या बाजूने आहेत ते त्यांनी सांगावं. मी तुमच्या नागपूरमधून सांगतो की, जर तुम्हाला याबाबत काहीही माहिती नसेल तर तुमचे हिंदुत्व हे ढोंगी आहे." 

हे वाचलं का?