सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
anna hazare reaction on sonam wangchuk hunger strike : सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, अशी भूमिका मांडली. त्यांनी उपोषणकर्त्याच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असेही म्हटले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया;
नेमकं काय म्हणाले?
anna hazare reaction on sonam wangchuk hunger strike : दिल्ली पोलिसांनी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारला या विषयावर संवाद साधण्याचा सल्ला दिला असून, वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस उपोषण केले असल्याने त्यांच्या संयमाची परीक्षा घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात किंवा नाकाराव्यात हा वेगळा मुद्दा असला, तरी त्यांच्याशी चर्चा होणे अत्यावश्यक असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका
उपोषणकर्त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही - आण्णा हजारे
जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारने या प्रकरणातील मौन सोडावे, असेही सांगितले. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ संवादातूनच मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. सरकारने स्वतःची भूमिका मांडावी आणि समोरच्या बाजूचेदेखील म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतरच तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 20 दिवस उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : अभिजीत दीपके यांच्यावर महिलेकडून शाईफेक, पोलिसांनी घेतलं ताब्यात, VIDEO










