पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने वार, हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्या करत संपवले जीवन
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात असणाऱ्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावच्या युवकाने कोयत्याने हल्ला केला आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने वार
हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्या करत संपवले जीवन
Pune Crime, रायचंद शिंदे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात असणाऱ्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावच्या युवकाने कोयत्याने हल्ला केला आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपीने गणेशखिंड याठिकाणी आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा : मुंबईच्या डॉक्टर स्तुती सोनावणेनं बॉयफ्रेंड फैजुलमुळे संपवलं आयुष्य, 'त्या' चिठ्ठीत हादरवून टाकणारा खुलासा
एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला
जुन्नर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी गौरी संजय साळवे (वय-18) ही विद्यार्थिनी बुधवारी 11 मार्च रोजी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली. यानंतर तिच्याच मूळ गावचा असणारा युवक महेश मुरलीधर डामसे,(वय 24,रा.आंबे,ता जुन्नर) या युवकाने तिच्यावर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हे ही वाचा : Valentine चा 'प्रेमळ' सापळा अन्... नराधमाकडून 17 वर्षीय मुलीसोबत अत्यंत घाणेरडं कृत्य










