कल्याण : बाथरुमचा नळ मुद्दाम चालू ठेवला, दुर्गंधी अन् व्हॉइस मेसेजने फ्लॅट मालकाची झोप उडाली

मिथिलेश गुप्ता

kalyan murder case : कल्याणमधील नीलकंठ सोसायटीत तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये पोत्यात आढळला. हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी नळ सुरू ठेवल्याचा संशय असून आरोपी महिला फरार आहे.

ADVERTISEMENT

kalyan murder case
kalyan murder case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कल्याण : बाथरुमचा नळ मुद्दाम चालू ठेवला

point

दुर्गंधी अन् व्हॉइस मेसेजने फ्लॅट मालकाची झोप उडाली

kalyan murder case : कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेने मृतदेह लवकर कुजावा आणि रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावेत यासाठी बाथरूमचा नळ सलग सुरू ठेवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO

फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आणि घरमालकाला आरोपी महिलेचा व्हॉइस मेसेज मिळाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध सुरू केला असून तिला अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कोलकात्याकडे रवाना झाले आहे.

तीन दिवसांपासून तीव्र दुर्गंधी अन् पोलिसांना बोलावण्याची वेळ 

मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमधून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मानपाडा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असता संबंधित फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान बाथरूममध्ये एक पोते आढळून आले. ते उघडून पाहिले असता त्यामध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने गोळा केले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?