बायकोच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायला गेला अन् गमावला जीव, नेमकं काय घडलं?
एक तरुण आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला सुखद धक्का देण्यासाठी घरी पोहोचला होता, मात्र काही वेळातच त्याचा मृतदेह घराच्या आत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ओडिशातील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायला गेला अन् गमावला जीव
नेमकं काय घडलं?
Crime News : पत्नीला वाढदिवसाचे सरप्राइज देण्यासाठी घरी परतलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील ही घटना असून मृत व्यक्ती मूळची जगतसिंगपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. तो आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला सुखद धक्का देण्यासाठी घरी पोहोचला होता, मात्र काही वेळातच त्याचा मृतदेह घराच्या आत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
कसा झाला मृत्यू?
याप्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित महिलेने आपल्या कथित प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा खुलासा पूर्ण तपास झाल्यानंतरच होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा : साताऱ्यात गोळीबाराचा थरार, लोकनियुक्त सरपंचाने कोणावर झाडल्या गोळ्या?
भावाला वेगळाच संशय
मृतकाच्या भावाने, पवित्र कुमार सेठी यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, "एक दिवसापूर्वी माझ्या वहिनीचा वाढदिवस होता. माझा भाऊ तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आला होता. त्यानंतर काही वेळाने मला वहिनीच्या भावाचा फोन आला आणि त्याने माझा भाऊ पवित्रने आत्महत्या केल्याचे सांगितले." या फोन कॉलमुळे कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला असून त्यांनी थेट हत्येचा आरोप केला आहे.
हे ही वाचा : नांदेड हादरले! शिक्षक अन् 2 मुलांच्या आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट, पोस्टमॉर्टेममधून धक्कादायक खुलासा
पोलिसांनी काय सांगितले?
दुसरीकडे, या प्रकरणावर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबीयांनी पत्नीवर हत्येचा आरोप केला असला तरी, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच महिला आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध झालेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे.










