'मला मोर्चात सहभागी व्हायचंय, डिस्चार्ज द्या', वांगचुक यांचं पत्र
Sonam Wangchuk Letter : दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाला त्यांनी चिठ्ठी लिहिली असून ज्यात त्यांनी स्वत:डिस्चार्जी मागणी केली आहे. त्यांनी चिठ्ठी लिहून संसदेच्या मोर्चात जायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून सरकारला पत्र
नेमकं काय म्हणाले?
Sonam Wangchuk Letter : दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाला त्यांनी चिठ्ठी लिहिली असून ज्यात त्यांनी स्वत:डिस्चार्जी मागणी केली आहे. त्यांनी चिठ्ठी लिहून संसदेच्या मोर्चात जायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर समोर आली आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पश्चिम महाराष्ट्रासह कोणत्या जिल्ह्यांना पवासाचा अलर्ट, जाणून घ्या हवामान
सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून सरकारला पत्र
सोनम वांगचुक यांनी सफदरगंज रुग्णालयात पत्र लिहून रुग्णालयातील प्रशासनाला सांगितलं की, आज माझी प्रकृती चांगली आहे. मी विनंती करतो, की मला थोड्या वेळासाठी रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी आज सकाळी होणाऱ्या संसदेवरील मार्चात सहभागी होऊ शकेन.
हे ही वाचा : '..तर मी उपोषण सोडेन', सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी; काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात लिहिलेले पत्र अधिकृतरित्या ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. त्यांनी नमूद केले की, सोनम वांगचुक सर्वांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून रुग्णालयात निर्बंध का घालण्यात आले आहेत. आज सोमवारी आरोग्य बुलेटीन नावाने जारी केलेल्या वृत्तानुसार, सोनम वांगचुक यांच्यावर व्हीएमसी आणि सफरदगज रुग्णालयात सर्वसामावेशक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांचे शरीर सध्या व्यवस्थित असून त्यांच्यावर बारकाईने वैद्यकीय पथकाची नजर आहे. वांगचुक हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत.