Maharashtra Weather : पश्चिम महाराष्ट्रासह कोणत्या जिल्ह्यांना पवासाचा अलर्ट, जाणून घ्या हवामान

मुंबई तक

Maharashtra Weather : काही भागांत मान्सूनचा यलो अलर्टचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलै 2026 रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती जाणवत होती, अशातच जाणून घेऊयात 20 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काही भागांत मान्सूनचा यलो अलर्ट

point

जाणून घेऊयात 20 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर काही भागांत मान्सूनचा यलो अलर्टचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलै 2026 रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती जाणवत होती, अशातच जाणून घेऊयात 20 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांचा घेतला आशीर्वाद, व्हिडिओ व्हायरल

कोकण 

कोकण विभागातील पालघर आणि मुंबई या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष़्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसासह वादळाची शक्यता आहे. नाशिकमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?