सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांचा घेतला आशीर्वाद, व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

supriya sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आशीर्वाद घेतले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती, त्याचदरम्यान सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांचे पाया धरत आशीर्वाद घेतले.

ADVERTISEMENT

supriya sule
supriya sule
Google CTA

बातम्या हायलाइट

point

खासदार सुप्रिया सुळेंनी राजनाथ सिंह यांचे पाय धरले

point

व्हिडिओ व्हायरल 

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आशीर्वाद घेतले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती, त्याचदरम्यान सुप्रिया सुळे यांची राजनाथ सिंह यांच्याशी भेट झाली होती, त्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे राजकीय चर्चांना वेग आलेला आहे. 

हे ही वाचा : 'ब्रश करताना मला फोन आला..', सोनम वांगचुक यांना पकडण्यापूर्वी काय घडलं?

अशातच या बैठकीला टीएमसी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काही खासदार देखील तिथे उपस्थित होते. ते विरोधी पक्षाच्या बैठकीतून बाहेर पडले होते. मात्र निषेधानंतर सर्व पक्षीय बैठकीत पुन्हा सामील झाले होते. या झालेल्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

व्हिडिओ व्हायरल 

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजकीय कार्याध्यक्ष आहेत. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला त्या उपस्थित होत्या. बैठकीतून परतताना त्यांची राजनाथ सिंह यांच्याशी भेट झाली होती. संरक्षण मंत्र्यांना पाहताच त्या त्यांच्या पाया पडल्याचं दिसून आलं. व्हिडिओत  केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा देखील दिसत आहे.  

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते थेट संपर्कात? अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएत सामील होणार असल्याच्या अधिक चर्चा आहेत. या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. तेव्हापासून शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर दिल्लीत असं चित्र दिसू लागलं आहे.   

हे वाचलं का?