'ब्रश करताना मला फोन आला..', सोनम वांगचुक यांना पकडण्यापूर्वी काय घडलं?

मुंबई तक

Abhijeet Dipke : आम्ही रात्री कोणीच इथून गेलो नाही. आम्ही 20 जुलैच्या आंदोलनाबाबत चर्चा करणार होतो. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी गेलो होतो. तोवर मला फोन आला की, सोनम सरांना उचलायला पोलीस आलेले आहेत. तेव्हा मी नुकताच ब्रशच करत होतो, मी ब्रश फेकून लगेच आलो तेव्हा तोंड देखील धुतलं नव्हतं, खाली आल्यानंतर मला काही पोलिसांनी पकडलं आणि बेदम मारहाण केली.

ADVERTISEMENT

Abhijeet Dipke
Abhijeet Dipke
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोनम वांगचुक यांना उचलण्यापूर्वी काय घडलं? दिपकेनं सर्वच सांगितलं

point

'पोलिसांनी पाठित-पोटात बुक्क्या मारल्या'

Abhijeet Dipke : 'सोनम सरांना उचलून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. ज्या पद्धतीने त्यांना नेलंय, यामुळे कुठेना कुठे लोकांमध्ये राग निर्माण झाला आहे. ससोनम सर हे गेली 20 ते 21 दिवसांपासून उपोषण करत होते. त्यांचं दहा किलो वजन कमी झालं होतं. त्यांना  नेण्यासाठी बेडशीट आणल्या गेल्या, 70 ते 80 लोक तिथे आले होते. त्यांच्या आरोग्याची एवढीच काळजी होती तर त्यांना सन्मानपूर्वक नेणं गरजेचं होतं. आजही त्यांना रुग्णालयात बंद करून ठेवलेलं आहे. त्यांनी अद्यापही उपोषण तोडलं नाहीय. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की, जर उपचार दिले जाणार नसतील तर इथं थांबवलं कशाला?', असं म्हणत अभिजीत दिपकेनं सरकाला पुन्हा सुनावलं आहे. पुढे त्याने सोनम वांगचुक यांना उचलण्यापूर्वी काय झालं, याची माहिती दिली. 

हे ही वाचा :  उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते थेट संपर्कात? अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं

सोनम वांगचुक यांना उचलण्यापूर्वी काय घडलं? दिपकेनं सर्वच सांगितलं

'हे घडणार होतं, त्याबाबतची माहिती आम्हाला होती. हे रात्रीच घडण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली होती, त्यासाठी आम्ही रात्री कोणीच इथून गेलो नाही. 20 जुलैच्या आंदोलनाबाबत चर्चा करणार होतो. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी गेलो होतो. तोवर मला फोन आला की, सोनम सरांना उचलायला पोलीस आलेले आहेत. तेव्हा मी नुकताच ब्रशच करत होतो, मी ब्रश फेकून तोंड न धुता आलो होतो. तेव्हा खाली आल्यानंतर मला काही पोलिसांनी पकडलं होतं.

'पोलिसांनी पाठित-पोटात बुक्क्या मारल्या'

पोलीस मला म्हणाले की, 'तुम्ही तिथून निघू शकत नाहीत. मी त्यांना का निघू शकत नाही? असा प्रश्न केला, मला लगेच जंतरमंतरवर जायचंय असं म्हणालो होतो. तेव्हा मी निघण्याचा प्रयत्न केला असता, मला पोलिसांनी पाठित-पोटात बुक्क्या मारल्या. जेव्हा मी मदतीसाठी ओरडलो तेव्हा माझं तोंड दाबलं आणि रस्त्यावर घासून नेलं. बिल्डींगच्या बेसमेंटखाली बसवलं, पोलिसांनी माझा मोबाईल घेतला होता.'

हे वाचलं का?