"त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, कृपया ...", अभिजीत दिपकेंचं आई-वडिलांबाबत सर्वांना महत्त्वाचं आवाहन
'ते थोडे घाबरलेले आहेत. मात्र त्यांनी काही काळजी करु नये असं मी त्यांना सांगितलं.' मुंबई तकशी बोलताना अभिजीत दिपके यांनी त्यांच्या आई-वडिलांविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठी माध्यमांना दिपकेंनी एक विनंती केली. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, कृपया ...",
अभिजीत दिपकेंचं आई-वडिलांबाबत सर्वांना महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke On Marathi Media : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात हलवल्यानंतर उपोषणाची धुरा अभिजीत दिपके यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. दिपकेंच्या या उपोषणाच्या निर्णयानंतर आणि वांगचुक यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर त्यांच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती याविषयी त्यांनी सांगितलं की, 'ते थोडे घाबरलेले आहेत. मात्र त्यांनी काही काळजी करु नये असं मी त्यांना सांगितलं.' मुंबई तकशी बोलताना दिपके यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठी माध्यमांना एक विनंती केली. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
'कृपया मुलाखती घ्यायला जाऊ नका'
मराठी माध्यमांना विनंती करताना दिपके म्हणाले की, 'मराठी मीडियाला माझी विनंती आहे की कृपया माझ्या आई-वडिलांच्या मुलाखती घ्यायला जाऊ नका. कारण ते मुलाखतीत रडतील. त्यांना खूप काळजी लागलेली आहे. ते खूप टेन्शनमध्ये आहेत. आईला अॅडमिट करावं लागलं होतं. तिची तब्येत खराब झाली होती. माझ्या आई-वडिलांना ब्लड-प्रेशरचा प्रॉब्लेम आहे.'
हे ही वाचा : 'सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही...' वांगचुक यांच्या पत्नीची उच्च न्यायालयात धाव
'त्यांची तब्येत बरोबर नाहीये'
यापुढं बोलताना दिपके म्हणाले की, 'जेव्हा हे आंदोलन सुरु झालं होतं, त्याच्या थोड्या दिवसांनंतर वडिलांना चकरा येणं सुरु झालं होतं. त्यांचंही ब्लड प्रेशर वाढलं होतं. आणि परवाच आईलाही दवाखान्यात न्यावं लागलं होतं. त्यामुळं मराठी मीडियाला माझी विनंती आहे. मी समजू शकतो तुम्हाला (मीडियाला) माझ्या घरच्यांची बाजू दाखवायची आहे की त्यांच्यावर या आंदोलनाचा काय परिणाम होतोय. पण कृपया त्यांच्या मुलाखती घ्यायला जाऊ नका. माझी विनंती आहे. कारण की ते खूप असुरक्षित (Vulnerable) आहेत सध्या आणि त्यांना खूप काळजी लागलेली आहे. आणि त्यांची तब्येत बरोबर नाहीये. त्यांच्या मुलाखती घ्यायला जाऊ नका.'
हे ही वाचा : पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट, पत्नीमार्फत दिला मेसेज
'दुसरा पर्याय राहिला नाही'
आंदोलनाची जबाबदारी माझी आहे हे सांगताना दिपके म्हणाले की, 'मी आई-वडिलांनाही सांगितलंय की तुम्ही मुलाखती देऊ नका. तर ते म्हणताहेत की मीडियावाले घरात येतायत तर करायचं काय? तब्येत त्यांची खराब आहे, पण मी त्यांना सांगितलंय की, आता मी मागे नाही सरकू शकत. ज्याप्रकारे ते सोनम सरांना किडनॅप करुन घेऊन गेलेले आहेत त्यानंतर आता माझी जबाबदारी आहे आंदोलन पुढं घेऊन जायला. आईचंही तेच म्हणणं होतं. वेळेवर नाही जेवलो तर डोकं दुखतं, उलट्या होतात. का करतोय तू? नको करु हे सगळं. पण आईला सांगावं लागलं की करावं लागेल आता मला. दुसरा काही पर्याय राहिलेला नाही.'










