उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते थेट संपर्कात? अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं

मुंबई तक

Abhijeet Dipke on Uddhav Thackeray phone calls : नीट पेपरफुटी संदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी सोनम वांगचुक जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावताना दिसताच पोलिसांनी त्यांना हटवून रुग्णालयात दाखल केलं. आता त्याच ठिकाणी अभिजीत दिपके उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी कोणत्या नेत्यांचा पाठिंबा मिळतोय? यासंदर्भात भाष्य केलं.

ADVERTISEMENT

Abhijeet Dipke on Uddhav Thackeray phone calls
Abhijeet Dipke on Uddhav Thackeray phone calls
Google CTA

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते संपर्कात?

point

अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं

Abhijeet Dipke on Uddhav Thackeray phone calls : नीट पेपरफुटीसंदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी आणि संबंधित मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मात्र, शनिवारी सकाळी (दि.18) सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरुन हटवलं आणि प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर आता कॉकरोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके त्याठिकाणी उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी 'मुंबई Tak' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना आंदोलनादरम्यान महाराष्ट्रासह देशातील कोणत्या नेत्यांनी फोन करुन चौकशी केली? उद्धव ठाकरे यांनी किती फोन केले? कोणी-कोणी पाठिंबा दिला? यासंदर्भात दिपके यांनी भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले? हे जाणून घेऊयात... 

हेही वाचा : 'सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही...' वांगचुक यांच्या पत्नीची उच्च न्यायालयात धाव

उद्धव ठाकरे यांचे किती फोन आले? अभिजीत दिपके यांचं उत्तर 

"मला सर्वात जास्त आभार कोणाचे मानायचे असतील तर उद्धव ठाकरेंचे मानायचे आहेत. मागील अनेक दिवसांपासून ते आमच्या संपर्कात आहेत. ते मला स्वत:च्या मुलाप्रमाणे बोलले. मी तुला अरे-तुरे करेन म्हणाले. कारण मला तू माझ्या मुलासारखाच आहे. स्वत:ची काळजी घे असं आवाहनही त्यांनी केलं. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, तेव्हा ते त्यांच्याबाबत विचारपूस करत होते. सोनम वांगचुक यांना काही झालं नाही पाहिजे, अशी त्यांची भावना होती. काहीही मदत लागली तरी मी फक्त एक कॉल दूर आहे. त्यांच्याशी सतत बोलणं झालं. गरज पडली तर मी तिथे येईल, असं आश्वासही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं.  उद्धव ठाकरेंचे जवळपास रोज फोन येतात. त्यांचा आम्हाला खास सपोर्ट आहे." असं अभिजीत दिपके म्हणाले आहेत..

हेही वाचा : बायकोच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायला गेला अन् गमावला जीव, नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?