पाण्यावरून वाद, महिलेला भररस्त्यात मारहाण; विवस्त्र करत व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेची शेजारच्यांसोबत पाण्यावरून वाद झाला होता. नंतर या वादाचे हिंसेत रूपांतर झाले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पीडितेला रस्त्यावर ओढत मारहाण केली, नंतर पीडितेला सर्वांसमोर विवस्त्र केले. या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेचा पाण्यावरून वाद अन् विवस्त्र करून मारहाण

point

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांची कारवाई 

Crime News : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेची शेजारच्यांसोबत पाण्यावरून वाद झाला होता. नंतर या वादाचे हिंसेत रूपांतर झाले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पीडितेला रस्त्यावर ओढत मारहाण केली, नंतर पीडितेला सर्वांसमोर विवस्त्र केले. या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे ही वाचा : Astrology : सूर्याचा कर्क राशीत प्रवेश, ऑगस्टमध्ये 'या' राशींवर होणार परिणाम

महिलेचा पाण्यावरून वाद अन् विवस्त्र करून मारहाण

संबंधित घटना ही गुंटूरच्या नगारामपालेम ठाणे क्षेत्रातील आहे. सुरूवातीला मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची शेजारच्यासोबत पाण्याच्या मोटारवरून वाद झाला होता. या वादाला पुढे हिंसक रूप प्राप्त झाले होते. वादादरम्यान एका पक्षातील लोकांनी दुसऱ्या पक्षातील महिलेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. महिलेला भररस्त्यात आणले आणि तिला मारहाण केली. सर्वांसमोर तिला विवस्त्र केले. या घटनेदरम्यान आसपासच्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. या घटनेचे केवळ व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. 

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांची कारवाई 

व्हिडिओ समोर आल्यानंतर नगरलमपलेम पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखले असून, मुख्य आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. या घटनेत सर्वांच्याच भूमिकेची चौकशी देखील केली होती, कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली. 

हे ही वाचा : पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट, पत्नीमार्फत दिला मेसेज

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट 

हे वाचलं का?