'..तर मी उपोषण सोडेन', सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी; काय म्हणाले?

मुंबई तक

Sonam Wangchuk hunger strike : सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवण्याची घोषणा केली असून मोदी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. कोणतीही एक अट पूर्ण झाल्यास 20 जुलै रोजी उपोषण सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

Sonam Wangchuk hunger strike
Sonam Wangchuk hunger strike
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'..तर मी उपोषण सोडेन',

point

सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी; काय म्हणाले?

Sonam Wangchuk hunger strike : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन अटी ठेवल्या असून, त्यापैकी कोणतीही एक अट पूर्ण झाल्यास आपण उपोषण सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये वांगचुक यांनी, "मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवेन, जर..." असे लिहित सरकारपुढे आपल्या अटी मांडल्या. त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयश, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि संबंधित प्रकरणांमध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी पहिली अट मांडली आहे. शिक्षण व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा : सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांचा घेतला आशीर्वाद, व्हिडिओ व्हायरल

"नीट पेपर फुटीचा विषय नेत्यांनी संसदेत मांडावा"

दुसऱ्या अटीत वांगचुक यांनी म्हटले आहे की, जर मी आणि सीजेपी (CJP) चे नेते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले आणि विविध राजकीय पक्षांचे खासदार व नेत्यांनी हा विषय संसदेत प्राधान्याने मांडण्याचे आश्वासन दिल्यास मी उपोषण सोडेन. तिसऱ्या अटीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर त्यांच्या प्रकृतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हे शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन वरील मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यास ते उपोषण मागे घेतील.

हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ

हे वाचलं का?