दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO

मुंबई तक

delhi jantar mantar neet protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपर लीक प्रकरणाविरोधातील आंदोलनाला मोठी गर्दी झाली असून ड्रोनमधून टिपलेला व्हिडीओ समोर आला आहे. लाठीचार्ज, इंटरनेट बंद आणि मोबाईल जॅमर्स वाढवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

delhi jantar mantar neet protest
delhi jantar mantar neet protest
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी

point

ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO

delhi jantar mantar neet protest : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, 20 जुलै 2026 रोजी सुरुवात होत असतानाच कॉकक्रोच जनता पार्टी (CJP) ने 'चलो संसद' मार्चची हाक दिली. आंदोलनस्थळ आणि जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील प्रचंड गर्दी ड्रोनद्वारे टिपण्यात आली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सकाळी 9 वाजताचा आहे.  या आंदोलनादरम्यान संसदेकडे कूच करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरूच असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, समृद्धी महामार्गावर 6 जणांचा होरपळून मृत्यू

 मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवली, आंदोलकांवर लाठीचार्ज 

आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यानंतर जंतर-मंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच दिल्ली परिसरात मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून आंदोलनाचा विस्तार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडींमुळे जंतर-मंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा : '..तर मी उपोषण सोडेन', सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी; काय म्हणाले?

हे वाचलं का?