CJP Protest Live Update : आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, संसदेजवळ कडेकोट बंदोबस्त

मुंबई तक

CJP Protest Live Update : कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चाविरोधात सरकारकडून बळाचा वापर करण्यात आलाय. अशातच नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांनी उपोषण सोडलं आहे.

ADVERTISEMENT

CJP Protest Live Update
CJP Protest Live Update
Google CTA

बातम्या हायलाइट

point

CJP Protest Live Update : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

point

मेट्रो सेवा बंद; दिल्लीत काय घडतंय?

CJP Protest Live Update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, 20 जुलै 2026 रोजी सुरुवात होत असतानाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात कॉकक्रोच जनता पार्टी (CJP) ने मोठ्या 'चलो संसद' मार्चला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात येतोय. आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र तरीही संसदेवर जाण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

कॉकरोच जनता पार्टीचे आणि विद्यार्थी आंदोलक संसदेजवळ पोहोचू लागल्याचं दिसताच त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शिवाय, संसदेजवळ बंदोबस्त वाढवण्यात आलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झाले असून सीजेपीचं शिष्टमंडळ जे पी नड्डांच्या भेटीला पोहोचले आहे. 

अभिजीत दिपकेचं उपोषण मागे

नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके याने पाणी पिऊन उपोषण सोडलं आहे. गेल्या काही तासांपासून अभिजीत दिपके यांनी उपोषण केलं होत, मात्र त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याने आपलं उपोषण सोडलं.  
 

आंदोलकांवर लाठीचार्ज, सरकारकडून बळाचा वापर 

मार्चदरम्यान आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असून रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर केला जात आहे. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हे वाचलं का?