भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, समृद्धी महामार्गावर 6 जणांचा होरपळून मृत्यू
samruddhi mahamarg wardha car truck accident : समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यात कार आणि आयशर ट्रकच्या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
समृद्धी महामार्गावर 6 जणांचा होरपळून मृत्यू
samruddhi mahamarg wardha car truck accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील वेरूळ आकाजी परिसरात रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला. कार आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी क्षणात पेट घेतला. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने वाहनांमधील सहा जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली.
एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याचे रहिवासी असलेले टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून कारने घरी परतत होते. मुलीच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आनंदात परतीचा प्रवास सुरू असतानाच त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार आणि ट्रक या दोन्ही वाहनांनी क्षणात आग पकडली. काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने आणि आगीच्या लोटांनी वेढला गेला.
हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ










