सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी, पदवीधरांना मिळणार बक्कळ पगार, काय आहेत अटी?

मुंबई तक

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड द्वारे 'असिस्टंट (क्लास III)' या पदासाठी तब्बल 500 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्ट आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी

point

पदवीधरांना मिळणार बक्कळ पगार

point

काय आहेत अटी?

Government Jobs : बँकिंग आणि विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) द्वारे 'असिस्टंट (क्लास III)' या पदासाठी तब्बल 500 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. यामध्ये नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट लागू असेल.

हे ही वाचा : अभिजीत दीपके यांच्यावर महिलेकडून शाईफेक, पोलिसांनी घेतलं ताब्यात, VIDEO

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट आहे. परीक्षा शुल्काचा विचार केला तर सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांसाठी 850 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे, तर एससी (SC), एसटी (ST), दिव्यांग (PWD) आणि माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध; बेडवर विषारी साप सोडून खून

वेतन आणि अधिकृत संकेतस्थळ

या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांतील परीक्षांच्या माध्यमातून होणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्याची परीक्षा (Phase I) 27 ऑगस्ट रोजी घेतली जाईल, तर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या टप्प्याची मुख्य परीक्षा (Phase II) 30 ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर (nationalinsurance.nic.co.in) जाऊन आपले अर्ज सादर करता येतील. तसेच अधिम माहितीही घेता येईल. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला मेट्रो शहरांमध्ये अंदाजे 53,000 रुपये प्रतिमहिना इतके घसघशीत वेतन (Gross Emoluments) मिळणार आहे. याशिवाय नियमानुसार वैद्यकीय लाभ, ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी आणि रजा प्रवास सवलत (LTS) यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचे फायदेही कर्मचाऱ्यांना दिले जातील.
 

हे वाचलं का?