CJP च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा, 5000 जवान तैनात; कलम 163 लागू
cjp chalo sansad march : NEET पेपर लीक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर CJP ने 'चलो संसद' मार्चची घोषणा केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत BNSS कलम 163 लागू करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CJP च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा
500 जवान तैनात; कलम 163 लागू
cjp chalo sansad march : देशातील NEET पेपर लीक विरोधात कॉकक्रोच जनता पार्टी (CJP)ने आंदोलन अधिक तीव्र करत 20 जुलै 2026 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'चलो संसद' मोर्चाची घोषणा केली आहे. संसद अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या मार्चला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे परिक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी 19 जुलैच्या सायंकाळपासून जंतर-मंतर येथे जमण्यास सुरुवात केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन आणि परिसरात विशेष सतर्कता बाळगण्यात आली असून दिल्ली पोलिसांसह गुप्तचर यंत्रणाही पूर्णपणे अलर्टवर आहेत.
हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ
अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा
सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी जंतर-मंतर, पार्लियामेंट स्ट्रीट, सेंट्रल व्हिस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक परिसरात थ्री-टियर सुरक्षा ग्रिड उभारण्यात आला आहे. या व्यवस्थेत दिल्ली पोलिसांच्या दोन सुरक्षा स्तरांसह पॅरामिलिटरी दलाचा एक स्वतंत्र सुरक्षा स्तर तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथके चोवीस तास सज्ज ठेवण्यात आली आहेत. संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ










