Govt Jobs : इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, काय आहेत निकष? जाणून घ्या सविस्तर
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या 'विक्रम साराभाई अंतराळ केंद्र' द्वारे 'ॲप्रेंटिस ट्रेनी' पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 460 जागा भरल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
काय आहेत निकष?
जाणून घ्या सविस्तर
ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अंतर्गत येणाऱ्या तिरुवनंतपुरम येथील 'विक्रम साराभाई अंतराळ केंद्र' द्वारे 'ॲप्रेंटिस ट्रेनी' (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 460 जागा भरल्या जाणार असून, यामध्ये 273 पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) आणि 187 तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Apprentice) पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नसून इच्छुक व पात्र उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
'इथे' होईल भरती
विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने 17 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड थेट 'वॉक-इन सिलेक्शन ड्राइव्ह' म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. ही निवड प्रक्रिया शनिवार, 25 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. याकरिता 'कार्तिका थिरुनल शासकीय व्ही. अँड जी.एच.एस.एस. फॉर गर्ल्स, मणकौड, तिरुवनंतपुरम, केरळ' हे स्थळ निश्चित करण्यात आले असून उमेदवारांना निर्धारित वेळेत तेथे उपस्थित राहावे लागेल.
हे ही वाचा : "त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, कृपया ...", अभिजीत दिपकेंचं आई-वडिलांबाबत सर्वांना महत्त्वाचं आवाहन
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विविध क्षेत्रांनुसार निश्चित करण्यात आली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी) पदासाठी उमेदवाराकडे किमान 65% गुणांसह किंवा 6.84 सीजीपीए सह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे, तर हॉटेल मॅनेजमेंटसाठी किमान 60% गुणांसह प्रथम श्रेणी पदवी असणे गरजेचे आहे. इतर सामान्य पदवीधरांसाठी (बिगर-अभियांत्रिकी) 60% गुणांसह तीन वर्षांची पदवी आवश्यक असून, त्यांना प्रशासन, वित्त व लेखा आणि खरेदी विभागात प्रशिक्षण दिले जाईल. तसेच तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी प्रथम श्रेणीतील तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा कमर्शिअल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा आवश्यक आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते थेट संपर्कात? अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं
मानधन किती?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांसह आणि प्रमाणपत्रांसह थेट निवड केंद्रावर हजर राहावे लागेल. या पदांसाठी वयोमर्यादेची गणना 31 जुलै 2026 या तारखेच्या आधारे केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून पुढील एका वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 10,900 रुपये, तर पदवीधर प्रशिक्षणार्थ्यांना 12,300 रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांनी 25 जुलै रोजी दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.vssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.










