ऑफिसमध्ये दोन तरुण, एकाशी लग्न केलं, दुसऱ्यासोबत अफेअर...शेवटी काय घडलं?

मुंबई तक

2017 मध्ये एकाच सरकारी विभागात एकत्र काम करण्यास सुरुवात केलेल्या तीन जणांच्या कहाणीचा शेवट एका खळबळजनक हत्येत झाला. बिहारमध्ये चर्चेत असेललं हे हत्याकांड नेमकं काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ऑफिसमध्ये दोन तरुण,

point

एकाशी लग्न केलं, दुसऱ्यासोबत अफेअर

point

शेवटी काय घडलं?

Crime News : 2017 मध्ये वीज विभागात एकत्र सरकारी नोकरी सुरू करणारे तीन तरुण- देव कुमार गुंजन, स्मिता कुमारी आणि अजित कुमार- नऊ वर्षांनंतर बिहारमधील एका अत्यंत चर्चिल्या गेलेल्या हत्याकांडात समोरासमोर येतील, असा विचार कोणीही केला नव्हता. एकत्र काम करता करता देव कुमार आणि स्मिता यांच्यात प्रेम झाले आणि 2018 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली आणि त्यांचे संसार सुखाने सुरू होते. मात्र, काळाच्या ओघात या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि एका सुखी कुटुंबाचा अंत चालत्या ट्रेनमधील थरारक गोळीबाराने झाला, ज्याचा तपास करताना आता पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

रेल्वेत गोळ्या झाडून हत्या

11 जून 2026 रोजी जमुई येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले देव कुमार गुंजन आपल्या पत्नीला भेटण्यासाठी रेल्वेने निघाले होते. त्यांची पत्नी स्मिता कुमारी ही सुपौल येथे मोटार वाहन निरीक्षक (MVI) म्हणून तैनात होती. मानसीहून सुपौलकडे जाणारी जनसाधारण एक्सप्रेस बदलाघाट स्थानकाजवळ पोहोचली असता, चालत्या ट्रेनमध्ये देव कुमार यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना ट्रेनमधील दरोड्यादरम्यान झालेली हत्या वाटत होती आणि खुद्द पत्नी स्मिता कुमारी हिनेही रडत-रडत पोलिसांना सांगितले की, दरोडेखोरांनी लूटमारीला विरोध केल्यामुळे तिच्या पतीची हत्या केली.

हे ही  वाचा : लातूर : ह्रदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांच्या आत्महत्येने हळहळ, गुंगीचं औषध घेतलं अन्...

लव्ह ट्रँगल समोर

परंतु, रेल्वे पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक (SIT) आणि एसटीएफच्या तपासात काही वेगळेच संशयास्पद धागेदोरे हाती लागले. दरोडेखोरांनी केवळ गोळी मारून पळ का काढला आणि इतर प्रवाशांना लक्ष्य का केले नाही, या प्रश्नाने तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि संशयितांच्या डिजिटल हालचाली तपासल्या तेव्हा एक धक्कादायक त्रिकोण समोर आला. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात एकत्र असलेले अजित कुमार आणि स्मिता कुमारी यांचे 2023 मध्ये पुन्हा जवळचे संबंध निर्माण झाले होते. देव कुमार बदली झाल्यानंतर आणि स्मिता सुपौलला गेल्यानंतर अजित आणि स्मिता यांच्यातील जवळीक वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

हे ही वाचा : तरुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरून परिधान करायचा, छुप्या कॅमेऱ्यात सगळंच रेकॉर्ड

प्रेमात नवऱ्याचा अडथळा

पोलिसांच्या दाव्यानुसार, या प्रेमसंबंधात पती देव कुमार गुंजन हा सर्वात मोठा अडथळा ठरत होता. यामुळेच स्मिता आणि अजित यांनी त्याला कायमचे वाटेतून बाजूला करण्याचा कट रचला. यासाठी जहानाबाद येथील राजू कुमार उर्फ धीरज या शार्प शूटरला चार लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. गुन्ह्याचा कोणताही डिजिटल पुरावा राहू नये म्हणून ही रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. शूटरने अनेक दिवस देव कुमार यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आणि अखेर 11 जून रोजी संधी साधून बदलाघाट स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमध्ये त्यांची हत्या केली व त्याला लूटमारीचे रूप देण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?