मराठा महिलांनी फडणवीस, शिंदेंच्या पत्नीला हळद-कुंकू लावून आरक्षण मागावं, हळद-कुंकू नाही लावलं तर… जरांगेंनी टाकला भलताच नवा डाव?

मुंबई तक

मनोज जरांगे यांनी मराठा महिलांना मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीला कुंकू लावून आरक्षणाची मागणी करण्याचे आवाहन केले आहे. हळदी-कुंकू स्वीकारले नाही तर त्यांच्या प्रतिमेला डाग लागेल, असेही जरांगे म्हणाले.

ADVERTISEMENT

manoj jarange maratha women haldi kunku Maratha reservation demand devendra fadnavis eknath shinde wives mumbai
मनोज जरांगे
Google CTA

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची दिशा अधिक आक्रमक करण्याचे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. मराठा महिलांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांना हळद-कुंकू लावत आरक्षणाची मागणी करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

जरांगे यांनी यावेळी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन महिलांना केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने महिलांकडून दिलेले हळदी-कुंकू स्वीकारले आणि त्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही, तर त्यांची मोठी बदनामी होईल, असा दावा त्यांनी केला.

‘आरक्षण दिलं नाही तर इज्जतीचा कचरा होईल’

जरांगे म्हणाले की, ‘मराठा महिलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला कुंकू लावून आरक्षणाची मागणी केली आणि त्यानंतरही आरक्षण दिले गेले नाही, तर त्यांच्या इज्जतीचा कचरा होईल. हळदी-कुंकू स्वीकारूनही आरक्षण न दिल्यास त्यांना आयुष्यात वर मान करून चालता येणार नाही’, अशी तीव्र भाषा त्यांनी वापरली.