डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत होणार मोठी वाढ?
कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींविरोधात पोलिसांनी १८३४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. १५ सप्टेंबरपासून जलदगती न्यायालयात ट्रायल सुरू होणार असून, तीन महिन्यांत निकाल देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

कल्याणः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींविरोधात तब्बल 1834 पानी आरोपपत्र कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रमेश म्हात्रेंसह पाचही आरोपींना कल्याणच्या जलदगती न्यायालयात न्यायाधीश एन. पी. वसाडे यांच्या समोर हजर करण्यात आले.
कोर्ट 3 महिन्यात देणार निकाल?
आज या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली असून, आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्राची प्रत देण्याची मागणी केली आहे. 15 सप्टेंबरपासून ट्रायल सुरू होणार असून, तीन महिन्यांत निकाल देण्याचे न्यायालयाचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींविरोधात 1834 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शुक्रवारी रमेश म्हात्रेंसह पाचही आरोपी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले.
या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात न्यायाधीश एन. पी. वसाडे यांच्या समोर झाली. आज प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी 1834 पानी आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
