'तुझे फॉलोअर्स वाढवून देतो..' पोलीस उपनिरीक्षकाने हॉटेलवर बोलावलं अन्...
फॉलोअर्स वाढवून देण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील ही घटना असून यामध्ये आरोपी पोलीस असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुझे फॉलोअर्स वाढवून देतो..
पोलीस उपनिरीक्षकाने हॉटेलवर बोलावलं अन्...
Crime News : रील व्हायरल करण्याचे आणि फॉलोअर्स वाढवून देण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील एका महिला इन्फ्लुएन्सरवर हॉटेलमध्ये बलात्कार करण्यात आल्याची ही घटना आहे. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे यामधील आरोपी एक पोलीस उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे.
हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एसएसबीचे एएसआय विकास कुमार आणि त्यांचा साथीदार राजीव राय यांनी तिच्या सोशल मीडियावरील रील्स व्हायरल करण्याचे आणि फॉलोअर्स वाढवण्याचे आमिष दाखवले होते. याच बहाण्याने त्यांनी तिला मुझफ्फरपूरमधील स्टेशन रोड येथील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला.
हे ही वाचा : मराठा महिलांनी फडणवीस, शिंदेंच्या पत्नीला हळद-कुंकू लावून आरक्षण मागावं, हळद-कुंकू नाही लावलं तर… जरांगेंनी टाकला भलताच नवा डाव?
अश्लील व्हिडीओ चित्रीत केले
पीडितेने आरोप केला आहे की, मुझफ्फरपूरला पोहोचल्यानंतर राजीव राय याने हॉटेलच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. यानंतर आरोपींनी तिला एएसआय विकास कुमार याच्यासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडित महिलेने या घृणास्पद प्रकाराला कडाडून विरोध केला, तेव्हा आरोपींनी तिच्यासोबत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या निष्पाप बाळाला जीवे मारण्याची आणि क्रूरतेची धमकी दिली.
हे ही वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत होणार मोठी वाढ?
जबाब बदलण्यासाठी धमक्या
याप्रकरणी पीडित महिलेने सुरुवातीला एसएसबी मुख्यालयात तक्रार नोंदवली असून त्याबाबत अंतर्गत तपास सुरू आहे. याच दरम्यान, दोन्ही आरोपी तिला जबाब बदलण्यासाठी आणि तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितेने मुझफ्फरपूर पोलिसांत नवीन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्वरित पावले उचलत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
