नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत

मुंबई तक

Nashik Crime : नाशिक पोलिसांनी स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ADVERTISEMENT

Nashik Crime
Nashik Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक;

point

एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत

Nashik Crime : स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ ​​'कॅप्टन खरात' याला बलात्काराच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. एका 35 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर खरात विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने 18 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजता अटकेची कारवाई केली.

 एकनाथ शिंदेंचा 'हात' पाहिल्याने तो आला होता चर्चेत

अशोक खरात हा अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध असून, राज्याचे अनेक दिग्गज नेते आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे जात असत. नोव्हेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली होती, तेव्हा खरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा 'हात' पाहिल्याने तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.

हेही वाचा : टेन्शनचे दिवस संपले! 21 मार्चपासून शनी आपली चाल बदलणार, 'या' तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणार चमत्कार

पोलीस तपासात 58 व्हिडिओ समोर 

कॅप्टन खरात याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या विविध ठिकाणांवर शोधमोहीम राबवली असता, तपासात 58 व्हिडिओ मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिडिओ काही प्रसिद्ध महिला आणि सेलिब्रिटींशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या या जप्त केलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी करत असून, यातून अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरात हा मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून, केवळ राजकीय नेतेच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपतीही त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असत.

हे वाचलं का?

    follow whatsapp