लेह लडाखहून घरी परतताना 30 फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात, पुण्यातील 3 जिवलगांचा करुण अंत
Pune Accident : दिल्ली-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला. डुलकी लागल्याच्या संशयातून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात पुण्यातील तिघांचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अपघातात पुण्यातील तरुणांचा मृत्यू
लेह-लडाखवरून पुण्याकडे येताना दुर्दैवी घटना
Pune Accident : कृष्णा पांचाळ - दिल्ली-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मित्रांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डुलकी लागल्याच्या संशयातून चालकाचे अचानकपणे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातादरम्यान कार 30 फूट खोल दरीत कोसळली. तिघेही मित्र लेह लडाखवरून ट्रिपचा आनंद घेऊन परतत असताना ही घटना घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अपघातात मृत पावलेले तरुण पुण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : मुंबईतील 32 वर्षीय पोलिसाचं प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल, गर्लफ्रेंडच्या वडिलांनी धमकी दिल्याचा आरोप, सुसाईड नोटमध्ये...
अपघातात पुण्यातील तरुणांचा मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागली असता आणि चालकाला नियंत्रणाबाहेर गेलेलं वाहन एका डिव्हायडरवर आदळलं, नंतर खोल दरीत कोसळलं. हा अपघात कोटा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाणे हद्दीत झाला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बालापुरा आणि कराडिया गावांनजीक घडलेल्या या घटनेदरम्यन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातात मृत्यू पावलेले तरुणांची ओळख सिद्धेश अल्हाट वय (21), कुणाल चोरडिय वय (25) आणि मयूरेश पाडाळे वय (23) अशी आहे.
लेह-लडाखवरून पुण्याकडे येताना दुर्दैवी घटना
तिघेजण 26 फेब्रुवारी रोजी लेह-लडाख येथे फिरण्यासाठी गेले होते. आपली ट्रिप पूर्ण करून ते पुण्याकडे परतताना हा भीषण अपघात झाला. संबंधित घटनेनंतर जवळच्या लोकांनी मदतकार्य केले. जखमींना सुरक्षित स्थळी एका आरोग्य केंद्रात नेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती, पण उपचारादरम्यान तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : मुंबईतील 32 वर्षीय पोलिसाचं प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल, गर्लफ्रेंडच्या वडिलांनी धमकी दिल्याचा आरोप, सुसाईड नोटमध्ये...
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. प्राथमिक तपासातून समोर आले की, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघाता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.










