रुपाली चाकणकरांकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं ट्वीट व्हायरल

मुंबई तक

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख केलाय. नेमकं काय म्हणाल्या? त्यांच्या ट्वीटमधून समजून घेऊयात..

ADVERTISEMENT

Rupali Chakankar
Rupali Chakankar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख

point

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

Rupali Chakankar on Nashik Rape Case : स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबाला बलात्कार प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडालीये. अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' खरात  असं या बाबाचं नाव असून अनेक राजकारणी लोकांसोबत त्याचा वावर असल्याचं समोर आलंय. नाशिक पोलिसांनी आज (दि.18) पहाटे त्याला अटक केलीये. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी चक्क त्याचे पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. शिवाय, 'कॅप्टन' खरात मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे, त्या ट्रस्टमध्ये चाकणकर या संचालक असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. दरम्यान, चारी-बाजूंनी आरोप होत असताना रुपाली चाकणकरांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्यात देखील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख केलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही चाकणकर यांनी आरोपीचा उल्लेख कसा केलाय? हे समजून घेऊयात.. 

हेही वाचा : अल्पवयीन मुलाचे मुलीशी अश्लील चाळे, ग्रामस्थांच्या आरोपानं खळबळ, खांबाला बांधून मारहाण करत व्हिडिओ रेकॉर्ड केले

कॅप्टन खरात यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही - चाकणकर 

"शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे.", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. ट

संविधानीक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळलीच पाहिजे - चित्रा वाघ 

या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून, महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात ला बेड्या ठोकल्या…हेच आमच्या सरकारचं खरं काम आहे. गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे की, कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. वैयक्तिक श्रद्धा प्रत्येकाची असू शकते; पण संविधानीक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळलीच पाहिजे. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी विवेक आणि संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित आहे. महिलांच्या सन्मानावर कुठलाही आघात आम्ही सहन करणार नाही हीच आमची ठाम भूमिका आहे…."

हे वाचलं का?

    follow whatsapp