महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

ऋत्विक भालेकर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निम्म्याहून खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर या संभाव्य पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Politics
Maharashtra Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी

point

ठाकरेंचे निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Maharashtra Politics :महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (यूबीटी) सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या लोकसभेतील 9 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदार सध्या शिंदे गटाच्या संपर्कात असून, ते लवकरच सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.  एकनाथ शिंदे यांनी आपली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि संसदेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी हे विशेष मिशन हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मोठ्या हालचाली 

या राजकीय हालचालींना अधिक बळकटी मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या विद्यमान खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या संभाव्य पक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा केल्याचे शिवसेना सूत्रांकडून समजते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी इच्छुक खासदारांच्या नावांची यादी तपासून पाहिली असून, त्यांच्या प्रवेशात कोणत्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात, याचाही सखोल आढावा घेतला आहे. यासाठी त्यांनी नामवंत कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत केली असून, पक्षांतरादरम्यान तांत्रिक पेच टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीतील या महत्त्वाच्या गाठीभेटींमुळे ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा कॉम्फिडन्स वाढल्याची चर्चा आहे. 

सध्या शिंदे गट या सर्व खासदारांच्या अधिकृत प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहत असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच हा मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. या संभाव्य फुटीमुळे केवळ ठाकरे गटाचे संसदेतील बळ कमी होणार नाही, तर विरोधकांची आघाडी देखील कमकुवत होऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गुप्तता पाळत ही रणनीती आखली असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. जर हे खासदार खरोखरच शिंदे गटात सामील झाले, तर ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी राजकीय पिछेहाट ठरेल आणि एकनाथ शिंदे यांचे 'असली शिवसेना' सिद्ध करण्याचे प्रयत्न अधिक यशस्वी होतील.

 2024 साली ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या खासदारांची यादी 

1) अरविंद सावंत- दक्षिण मुंबई लोकसभा

हे वाचलं का?

    follow whatsapp