अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाला झटका, रात्री दोन वाजता जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई तक

Akola News : अकोला महानगरपालिकेत मोठा उलटफेर झाला असून शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे अकोला महानगरपालिकेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Akola News
Akola News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाला झटका

point

रात्री दोन वाजता जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Akola News, धनंजय साबळे : अकोला महानगरपालिकेत मोठा उलटफेर झाला असून शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे अकोला महानगरपालिकेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत

रात्री दोन वाजता पक्षप्रवेश

नुकत्याच झालेल्या महापानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. यापैकी चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी रात्री दोन वाजता हा पक्षप्रवेश पार पडला. या चार नगरसेवकांसोबतच जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

ठाकरे गटाकडे उरले फक्त दोन नगरसेवक

शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भारुका, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशानंतर आता अकोला महापालिकेत ठाकरे गटाकडे फक्त दोनच नगरसेवक उरले आहेत. पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर महापौरपदासाठी दिलेल्या उमेदवार सुरेखा काळे यांचाही समावेश असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.