सुरक्षा रक्षकाने मुक्या जनावराला शालीत गुंडाळलं, केबिनमध्ये केला अत्याचार
crime news : भटक्या जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एका सुरक्षारक्षकाने मुक्या जनावराला आपल्या शालीत गुंडाळून केबिनमध्ये नेले होते. त्यानंतर मुक्या जनावरावर लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुरक्षा रक्षकाकडून श्वानावर अत्याचार
भटक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Crime News : भटक्या जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एका सुरक्षारक्षकाने मुक्या जनावराला आपल्या शालीत गुंडाळून केबिनमध्ये नेले होते. त्यानंतर मुक्या जनावरावर लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली. हा प्रकार हैदराबाद येथील मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यातील कोमपल्ली भागातील आहे. संबंधित जनावर हे मादी कुत्रा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गु्न्हा दाखल करून तपास केला.
हे ही वाचा : बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन
हे प्रकरण कोमपल्ली येथील साईनगरमधील एका अलिशान अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील आहे. आरोपीची संजय तिवारी (वय 50) अशी ओळख समोर आली. संजय हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ही दुर्दैवी घटना 8 ऑक्टोबर रोजी घडल्याची माहिती आहे. या घटनेनं संबंधित परिसर हादरून गेला आहे.
सुरक्षा रक्षकाकडून श्वानावर अत्याचार
संजय तिवारी या आरोपीने अपार्टमेंटमधील आपल्या केबिनमध्ये कुत्र्याला शालीत गुंडाळून नेले होते. स्ट्रे अॅनिमल फाउंडेशन ऑफ इंडियाने मादी श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. फाउंडेशनच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा पुढील तपास केला.
हे ही वाचा : लातूर: 11 वर्षीय मुलीचा थंडी- तापाने उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबीयांनी डॉक्टरांना धरलं धारेवर
भटक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनमुळे निवासी संकुलांमध्ये राहणाऱ्या भटक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही प्राण्यांना संवेदनशीलतेने वागवावे अशी अपेक्षा आहे. आता पोलीस तपासातून या आरोपांमागील पडताळली जाईल आणि प्रकरणाची पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
