मुंबईची खबर : बीएमसी करणार विहिरींचे पुनरुज्जीवन, प्रत्येक विहीरीसाठी 5 लाख रुपयांचा खर्च; काय आहे प्लॅन?

मुंबईकरांवर असलेल्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी बीएमसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील पारंपरिक विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

BMC Well Rejuvenation
BMC Well Rejuvenation
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बीएमसी करणार विहिरींचे पुनरुज्जीवन

point

प्रत्येक विहीरीसाठी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च

BMC Well Rejuvenation : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. बीएमसी आता शहरातील पारंपरिक विहिरींचे पुनरुज्जीवन करणार असल्याते समोर आले आहे. मुंबईतील पाणीपुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी बीएमसीने 30 लाख रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर केला आहे. 

विहिरींचे होणार पुनरुज्जीवन

पहिल्या टप्प्यात प्रत्येक वॉर्डातील निवडक विहिरींची स्वच्छता, गाळ काढणे आणि दुरुस्तीची कामे केली जातील. तसेच, विहिरीतील पाण्याचा योग्य वापर सुलभ व्हावा यासाठी 5,000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, वॉटर पंप आणि आवश्यक उपकरणे बसवली जाणार आहेत. प्रत्येक विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेने सुमारे 4.82 लाख ते 5 लाख रुपयांचा प्रमाणभूत अंदाजपत्रक तयार केले आहे.

हे ही वाचा : 19 लाख रुपयांसाठी शिक्षिकेला संपवलं, नंतर तिच्या मुलाला जंगलात नेलं अन्...

पाणीसाठ्याची होणार बचत

विहिरींमधून मिळणारे हे पाणी प्रामुख्याने पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. यामध्ये बगीच्यांमधील झाडांना पाणी देणे, रस्ते व गल्ल्यांची स्वच्छता करणे, बांधकामाची कामे, तसेच टॉयलेट फ्लशिंग आणि स्वच्छता गृहांमधील इतर गरजांचा समावेश आहे. या बिगर-पिण्याच्या कामांसाठी विहिरींचे पाणी वापरल्यामुळे प्रक्रिया केलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटणार असून, मुंबईच्या सध्याच्या पाणीसाठ्याची बचत होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं

अंमलबजावणीला सुरुवात

मंजूर झालेला निधी संबंधित वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला असून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. विहिरींमधील साचलेला गाळ आणि कचरा हटवल्यामुळे विहिरींची पाणी साठवण क्षमता वाढेल आणि स्थानिक भूजल पातळी सुधारण्यासही मोठा दिलासा मिळेल. यामुळे मुंबईकरांवर उद्भवलेल्या पाण्याच्या संकटावर मात करणे शक्य होणार आहे.