19 लाख रुपयांसाठी शिक्षिकेला संपवलं, नंतर तिच्या मुलाला जंगलात नेलं अन्...
सुरजपूरमधील एका शिक्षिकेची आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 19 लाख रुपयांच्या मोहापायी त्यांच्याच एका ओळखीच्या व्यक्तीने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षिकेची निर्घृण हत्या
19 लाख रुपयांसाठी संपवलं
Crime News : एका शिक्षिकेची आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या सनसनाटी दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेरीस या हत्येचा पोलिसांनी छडा लावला आहे. छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यातील शिक्षिका रजनी बरेठ आणि त्यांचा मुलगा सुजल बरेठ या दोघांची हत्या करण्यात आली होती. सुमारे 19 लाखांच्या रक्कम हडप करण्याच्या लोभातून ओळखीच्याच व्यक्तीने ही दुहेरी हत्या केल्याचे समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवेश कुमार याची पत्नी आणि मृत शिक्षिका रजनी बरेठ एकाच शाळेत शिक्षिका होत्या. याच ओळखीमुळे आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. रजनी यांना सुमारे 19 लाख रुपयांचे कर्ज मिळणार असून ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची कुणकुण आरोपीला लागली होती. मोटरपार्ट्सच्या व्यवसायासाठी आरोपीवर कर्जाचा भार होता आणि त्याला पैशांची गरज होती. याच लालसापोटी त्याने हा भयानक कट रचला.
हे ही वाचा : Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं
हत्या कशी केली?
घटनेच्या दिवशी (9 ऑक्टोबर 2026) आरोपीने आधी रजनी यांच्याकडे पैसे मागितले, मात्र त्यांनी नकार दिल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यात स्टीलच्या बाटलीने वार केले. नंतर गळा दाबून त्यांची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह बाथरुममध्ये लपवून ठेवला. त्यानंतर, हा खून मुलगा सुजल याला समजेल आणि तो बिंग फोडेल या भीतीने आरोपीने सुजललाही कारमध्ये बसवून नेले. जंगलात नेऊन त्याच्या तोंडाला स्टोल बांधून मारहाण केली. सुजल पळून जाऊ लागताच आरोपीने त्याच्या डोक्यात तुटलेल्या सिमेंटच्या खांबाने वार केले.
हे ही वाचा : जालना : मामाच्या गावी गेला अन् रात्री रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, 20 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न आणि अटक
गुन्हा केल्यानंतर आरोपीने मृतकाचे मोबाईल फोन, कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने लपवून ठेवले तसेच रक्ताने मळलेली कारची मॅट जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि कसून चौकशी करत आरोपी प्रवेश कुमार (वय 36, मूळ रा. हरियाणा, सध्या रा. विश्रामपूर) याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून मोबाईल आणि इतर ऐवज जप्त केला आहे.
