गुण मिळवून देण्याचे आमिष अन् पीडितेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
Crime News : एका खासगी शाळेतील कर्मचाऱ्याने प्रात्यक्षिक परीक्षेत गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना आहे. आरोपीने यात व्हिडिओतून तिला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रात्यक्षिक परीक्षेत गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचार
अश्लील फोटो व्हिडिओ रेकॉर्ड केले
Crime News : एका खासगी शाळेतील कर्मचाऱ्याने प्रात्यक्षिक परीक्षेत गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना आहे. आरोपीने यात व्हिडिओतून तिला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. निराश झालेल्या विद्यार्थिनीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या कुटुंबीयांना वेळेवर या घटनेची माहिती मिळाली. यादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील आहे.
हे ही वाचा : सुरक्षा रक्षकाने मुक्या जनावराला शालीत गुंडाळलं, केबिनमध्ये केला अत्याचार
12 वी इंटरमिजिएटच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
राक्सा पोलीस ठाणे परिसरातील एका गावात राहणारी अंदाजे 16 वर्षांची मुलगी ही शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता 12 वी इंटरमिजिएटची विद्यार्थिनी होती. त्याच गावत सुरेंद्र पाल नावाचा एक व्यक्ती मुलीच्या शाळेत काम करत होता. संबंधित प्रकरणात असा आरोप केला की, सुवेंद्रने परीक्षेच चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीव लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे अश्लील फोटो व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्यानंतर आरोपीने व्हिडिओंचा वापर करून विद्यार्थिनीला धमक्या देण्यास सुरुवात केली आणि भेटण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव आणला.
अश्लील व्हिडिओ फोटो दाखवून केले ब्लॅकमेल
पीडितेनं सततच्या मानसिक दबावाला बळी पडून आणि ब्लॅकमेल केल्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिच्या बहिणीच्या हे वेळेच लक्षात आले की तिने तात्काळपणे कुटुंबाला या भयंकर घटनेबाबत माहिती दिली. कुटुंब पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची सतक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 22 तारखेला गुन्हा दाखल केला आणि सखोल तपास केला.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर एसपी प्रीती सिंह यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, राक्सा पोलीस ठाणे परिसरात एका खासगी शाळेत इयत्ता 12 वीच्या विद्यार्थिनीने त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्यावर शरीरसंबंध ठेवल्याचा आणि प्रॅक्टिकलमध्ये गुण वाढवण्याच्या नावाखाली ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
हे ही वाचा : बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन
पोलिसांनी एफआरआय दाखल केला, नंतर पुढील तपास आणि पुरावे गोळा केल्यानंतर आरोप खरे असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आरोपी सुवेंद्र पॉलला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले.
